पंढरपूर येथे वाळू माफियांकडून तहसीलदारांच्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न


पंढरपुर/प्रतिनिधी: भीमा नदीवर सुरु असलेल्या बेकायदा वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेले पंढरपुरचे तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्यासह तलाठी मूसाक काझी, कैलास भुसिंगे, प्रशांत शिंदे यांच्यावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या जीवघेण्या हल्ल्यात तहसीलदार वाघमारे यांच्यासह तलाठी काझी थोडक्यात बचावले आहे.
  पंढरपुर तालुक्यातील सांगोला जॅकवेल परिसरातील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपशावर तहसीलदारांच्या पथक धाड टाकण्यासाठी गेले असता, तेथे वाळू घेऊन चाललेल्या विना नंबर प्लेटच्या एका वाहने थेट तहसीलदार यांच्या पथकावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रसंग सावधान ओळखून आपला बचाव करून घेतला. या हल्ल्यात तहसीलदार वाघमारे यांच्यासह पथकातील सहकाऱ्याना कोणताही दुखपत झालेली नाही.

    या घटनेची खबर पंढरपुर पोलिसांना देण्यात आली. पंढरपुर पोलीस ठाण्यात अण्णा पवार, ग्याबना धोत्रे, भैय्या उर्फ प्रकाश गंगथडे या वाळू माफियांच्याविरोधात प्राणघातक हल्ला करणे, वाळूची चोरी करणे असे गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती पोलीस वरिष्ठ निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.

Post a Comment

0 Comments