विनापरवाना गाईंची वाहतूक करणारा टेम्पो पकडला; तिघांवर गुन्हा दाखल.

आजरा/प्रतिनिधी: आजरा शहरांमध्ये विक्री करण्यासाठी आणलेल्या गाईंचा टेम्पो पोलिसांनी सी डी फार्म येथे रात्री साडेदहा वाजता पकडला. वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना तीन गाई व एक वासरू असे घेऊन एक महिंद्रा मॅक्झिमो एम.एच.०६ बी.जी.२५८९ गाडी सीड फार्म आजरा येथे आले असता, आजरा पोलिसांनी सापळा रचून पकडल.

यात गाडी चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे गाडी चालक अझीम अक्रम मुल्ला (वय २५),मोहम्मद युनुस इमाम शेख (वय २३), मुस्‍तकीम इक्बाल नाईकवाडे (वय २२) सर्व राहणार आजरा याच बरोबर गाडीसह दोन लाख ३५ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस नाईक चेतन घाडगे, अमर अडसुळे, प्रवीण काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments