अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू होऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता सुशांतच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत जवळपास २५ पेक्षा अधिक लोकांना चौकशीसाठी नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
अनिल देशमुख यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, "सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच गरज पडल्यास करण जोहर आणि त्याच्या मॅनेजरची देखील चौकशी केली जाईल," अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.
0 Comments