माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवडे यांच्या पत्नीचे निधन

इचलकरंजी /प्रतिनिधी;  इंदिरा गांधी महिला सहकारी सूत गिरणीच्या संस्थापक अध्यक्षा सौ . इंदुमती कल्लाप्पाण्णा आवाडे (वय – ८७) यांचे आज (शनिवारी ) दुपारी १२.१५ वाजता इचलकरंजी वृद्धापकाळाने निधन झाले. माजी खासदार माजी उद्योग राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या त्या पत्नी होत. तर राज्याचे माजी वस्त्रोद्योग मंत्री विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांच्या त्या मातोश्री होत.

चिकोडी तालुक्यातील भोज हे त्यांचे जन्मगाव . कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या इचलकरंजीत आल्या . कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या राजकीय, सामाजिक, सहकार वाटचालीत त्यांनी मोठे सहकार्य केले. देशातील पहिल्या इंदिरा गांधी महिला सहकारी सूतगिरणीच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या. या सूतगिरणीच्या उभारणीत त्यांची मोलाची कामगिरी होती. त्यांच्या जाण्याने आवाडे कुटुंबीयात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments