राकेश करमळकर/आजरा:
गेली काही वर्षे कर्नाटकातून तालुक्यात आलेल्या हत्ती मुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्याचे हाता तोंडाला आलेले पीक हत्तीच्या भक्षस्थानी पडत आहे. जंगली हत्तीं मुळे होणाऱ्या नुकसानीचे बाजारभावानुसार मूल्यांकन व्हावे यासाठी आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आजरा परिक्षेत्र वन अधिकारी एस. के. लाड यांना देण्यात आले.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे म्हणाले, की गेले काही दिवस आजरा व चंदगड परिसरात जंगली हत्ती कडून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे या शेतकर्यांना शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई ही तुटपुंजी आहे. तसेच सध्या तालुक्यात हत्तीचा वावर असल्याने शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे त्याचबरोबर हत्ती आता मानवी वस्तीमध्ये शिरू लागला आहे त्यामुळे शासनाने या जंगली हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. तर या हत्ती वर नजर ठेवण्यासाठी मोबाईल यांचा वापर करावा.
तर हाळोली येथे वनविभागा सोबत झालेल्या बैठकीमध्ये नागरिकांनीही हत्ती गावात शिरल्या बद्दल संताप व्यक्त केला. तर वनक्षेत्र अधिकारी एस. के. लाड यांनी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.तर रेस्क्यू टीम बरोबर पोलीस अधिकारी नेमावेत अशी मागणी केली.या बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, आजरा साखर कारखान्याचे संचालक दशरथ अमृते, प्रा. सुनील शिंत्रे, चंदगड विभाग मतदार संघाचे संघटक संग्राम दादा कुपेकर, जिल्हा संघटक संभाजी पाटील, तालुकाप्रमुख राजू सावंत, युवराज पोवार, ओमकार माध्याळकर, दिनेश कांबळे, मारुती डोंगरे आदी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments