कोल्हापूर लॉकडाउन अपडेट: जिल्ह्यात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरू

सुनसान रस्ते, बंद झालेली दुकाने आणि चौकाचौकात पोलीस बंदोबस्त असे गंभीर वातावरण आजपासून सात दिवस कोल्हापूरकर अनुभवनार आहेत.लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी चांगलाच प्रतिसाद कोल्हापूरकरांकडून मिळत असल्याचे एकूण चित्र पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या ७ दिवसांच्या लॉकडाउनस आज सुरुवात झाली. वाढत्या कोरोना रुग्णांचे प्रमाण पाहता अत्यंत कडक लॉकडाउन पाळण्यास नागरिकांनी प्रतिसाद दाखविल्याचे आज सकाळपासून पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर पोलीस दलाने जागोजागी नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments