कोल्हापूर लॉकडाउन अपडेट: आजऱ्यात लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी

 कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.  कोल्हापूर जिल्ह्यामध्ये समूह संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने  सात दिवसाचा लॉक डाऊन जाहीर केला आहे . आजरा शहरांमध्ये लॉक डाऊन च्या दुसऱ्या दिवशी मुख्य रस्त्यावरती सन्नाटा पहावयास मिळत होता. नागरिकांनीही घरीच राहून लॉक डाऊन उत्तम प्रकारे पाळला आहे.

        आरोग्य सेवा वगळून सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आले आहे. बँक,पतपेढी या सुद्धा बंद ठेवण्यात आल्या आहेत तर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील मुख्य मार्गावर ती पोलीस येणा जाणाऱ्यांची कसून चौकशी करत आहेत. जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या कोणत्याही वाहनास शहरात प्रवेश दिला जात नाही.
        तहसीलदार विकास आहेर, सपोनि बालाजी भांगे व आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील हे शहरातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे व मास्क वापरण्याचे आवाहन करत आहेत तर पोलीस प्रशासनही शहर व तालुक्यात पेट्रोलिंग करत आहे. एकंदरीतच आजरा तालुका वासियांच्या व प्रशासनाच्या जागरूकतेमुळे तालुक्यामध्ये समूह संसर्गाचे प्रमाण अत्यल्प आहे.

Post a Comment

0 Comments