मन की बात' पंतप्रधान मोदींच भारतीयांना आवाहन; "महामारीपासून स्वतंत्र होऊन आत्मनिर्भर होण्यासाठी घेणार शपथ"

पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून संबोधित करताना कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याचं आठवण केली. त्याचबरोबर भारतातील करोना विरोधी लढाईबद्दल दिलासादायक माहिती दिली. यावेळी मोदी यांनी येणाऱ्या १५ ऑगस्टला एक शपथ घेण्याच आवाहन भारतीयांना “मन की बात’मधून केलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “पुढच्या वेळी ज्यावेळी आपण मन की बातमध्ये भेटू त्याच्या आधीच १५ ऑगस्ट येणार आहे. यावेळी १५ ऑगस्टही वेगळ्या परिस्थिती साजरा होईल. करोना महामारीच्या संकटामध्ये होणार आहे. माझं देशवासीयांना आवाहन आहे की, आपण स्वातंत्र्य दिनाला शपथ घ्यावी की, महामारीपासून स्वतंत्र होऊ. आत्मनिर्भर भारताचा संकल्प करा. काही नवीन शिकण्याचा आणि शिकवण्याचा संकल्प करावा.

आपल्या कर्तव्यांचं पालन करण्याचा संकल्प करा. आपला देश आज ज्या उंचीवर आहे, तो अनेक महान नेत्यांच्या तपश्चर्येमुळे आहे. ज्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यांच्यापैकी एक आहेत लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांची १ ऑगस्टला शंभरावी पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळक यांचं जीवन आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या सगळ्या खूप काही शिकवते,” असं मोदी म्हणाले

Post a Comment

0 Comments