कुरुंदवाडच्या माजी नगराध्यक्षांना कोरोनाची लागण


येथील माजी नगराध्यक्षांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी त्यांच्या पुत्र नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली होती. सांगली येथे त्यांच्यावर उपचार सुरू असून, माजी नगराध्यक्षांना संस्थात्मक अलगिकरणात ठेवण्यात आले होते. दरम्यान, औषधोपचार घेऊन बरे झालेले रुग्ण वगळता आज एक मिळून आलेल्या रुग्णासह १५ रुग्णांची नोंद झाली आहे.

कुरुंदवाड शहरात नागरिकांनी शासनाच्या जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र शहरात रुग्णसंख्येने आपले डोके वर काढत आज सोमवारी रात्री उशिरा एका माजी नगराध्यक्षांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात रुग्णांचा आकडा २८ वर गेला होता. काहीजण औषध उपचार घेऊन बरे झाले आहेत. रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने पुन्हा रुग्णसंख्या १५ वर गेली आहे.

Post a Comment

0 Comments