सिरसाव मधील 'तो' पहिलाच पॉझिटिव्ह रुग्ण

बार्शीत काम करणारा सिरसावमधील 'तो' तरुण पॉझिटिव्ह
परांडा/प्रतिनिधी: सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे थैमान वाढत आहे.अशातच कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या बार्शीत कोरोना संसर्गाने अनेक जण बाधित झाले आहेत. सिरसाव येथील हा तरुण बार्शीमध्येच काम करत होता. अत्यावश्यक सेवा असल्यामुळे त्याचे गावातून बार्शीसाठी दररोज येणे जाणे होते.

परांडा तालुक्‍यातील सिरसाव येथे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सिरसाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती मिळताच प्रशासनाची तारांबळ उडाली. 

पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कातील लोकांनी स्वतःहून पुढे येऊन कोरोना टेस्ट करावी, असे आवाहन  सिरसाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

1 Comments

  1. कृपया सर्वांनी म्हणजे जे जे संपर्कात आलेले असतील त्यांनी आपापली तपासणी करून घ्यावी.

    ReplyDelete