कोल्हापूर लॉकडाउन अपडेट: लॉकडाऊन कालावधीत कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार बंद

परिवहन कार्यालयामध्ये अनावश्यक गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिनांक 20 ते 26 जुलै या लॉकडाऊनच्या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.


ज्या नागरिकांनी कच्चे व पक्के लायसन्स, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, अनुज्ञप्ती नुतनीकरण इ. ऑनलाईन अपाँईटमेंट घेतलेल्या असतील अशा अपॉईटमेंट रिशेड्युल करण्यात येतील. याबाबतचे संदेश संबंधितांच्या मोबाईलवर येतील व वर्तमानपत्रात बातमी दिली जाईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. अल्वारिस यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments