भीमाकाठी वाळू माफियांवर धडक कारवाई; महसूल विभागाकडुन ८० ब्रास वाळू जप्त


पंढरपूर/ प्रतिनिधी: पंढरपुर तालुक्यात व्होळे येथे महसुल विभागाने वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून, तालुक्यातील भीमा नदीपात्रातून वाळूची चोरी करून वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी महसूलच्या पथकाने पकडले. महसूल विभाग कोरोनाच्या संकटामुळे उपाययोजना करण्यासाठी राबत असल्याने वाळू चोरट्यांचे फावले होते. 

व्हाळ परिसरातून जवळपास २० लाख रुपये किंमतीचा ८० ब्रास वाळूसाठा, एक जेसीबी, दोन ट्रक महसूल विभागाकडून कारवाईमध्ये जप्त करण्यात आला. अजूनही शेतातून मोठ्या प्रमाणात छापेसत्र सुरु आहे.
   व्होळे गावातील भीमा नदीपात्रातून ट्रॅक्टरव्दारे वाळूची अवैध वाहतूक केली जात असल्याची तक्रार ग्रामस्थानी  केली होती. त्यानुसार मंडळ अधिकारी समीर मुजावर, तलाठी प्रशांत शिंदे, एम. डी. पाटील, राजेंद्र वाघमारे, कैलास दुरसनगे, शिवशरण कटारे कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा घालून कारवाई केली
  पंढरपूरचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी सध्या बेकायदा वाळू उपसा विरोधात धडक मोहीम सुरु केली आहे. यातूनच या गावावर ही कारवाई आज सकाळच्या करण्यात आली.  या धडक कारवाईमुळे चोरटी वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना मोठा तडाखा बसला असून

Post a Comment

0 Comments