कृषी विभागाकडून वशिंबेतील खत दुकानाची तपासणी

करमाळा/प्रतिनिधी : जय किसान कंपनीचे बनावट पोटँश प्रकरण गाजत असताना महाधन कंपनीचे 19: 19: 19 या खतांमध्ये सुद्दा बनावट खत असल्याची लेखी तक्रार उंबरड येतील शेतकरी दादा हुंबे यांनी केली. या तक्रारीची दखल घेऊन तालुका कृषी अधिकारी सूरज पवार व पंचायत समिती कृषी अधिकारी कैलास मिरगणे कार्यतत्परता दाखवत कारवाई केली.
तालुका कृषी अधिकारी यांनी पाच प्रकारचे खतांचे नमुने घेतले असून पुढील तपासणी साठी पाठवले आहेत. तक्रारदार शेतकरी हुंबे यांनी सांगितले की, पाण्यात टाकल्यावर ह्या खतांचे गुलाबी कलरचे पाणी  होते. हे बनावट आहे दुकानदाराला सांगितल्या नंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. महाधन कंपनीच्या अधिकार्याशी संपर्क साधला असता कंपनीने असा कुठल्याही प्रकारचा माल विकलेला नाही.

Post a Comment

0 Comments