'त्या' उद्गाराविषयी अशोक गेहलोत यांची काँग्रेस हायकमांडकडून कानउघडणीपक्षातील आपले वरिष्ठ स्थान लक्षात न घेता राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याबद्दल ‘निकम्मा’, ‘नकारा’ असे शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची कानउघडणी करण्यात आली. गेहलोत यांची भाषा पूर्णपणे चुकीची होती, असे वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले.
( फोटो सौजन्य- फायनान्शियल एक्सप्रेस)

पायलट यांच्यावर टीका करताना अशोक गेहलोत यांनी निकम्मा-नकारा हे शब्द वापरले, त्याबद्दल हायकमांडकडून त्यांची कानउघडणी करण्यात आली.माजी उपमुख्यमंत्र्याबद्दल अशा पद्धतीच बोलणं, तुम्हाला शोभत नाही, असे पक्ष नेतृत्वाकडून गेहलोत यांना सांगण्यात आले. 

“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून तो निकम्मा, नकारा आहे, काही काम करत नाही हे आम्हाला ठाऊक होते” असे गेहलोत सचिन पायलट यांच्याबद्दल बोलताना म्हणाले. अशोक गेहलोत यांनी कुठेही सचिन पायलट यांचे नाव घेतले नाही. अशोक गेहलोत यांनी केलेल्या टिकेवर सचिन पायलट यांनी काहीही प्रत्युत्तर दिलेले नाही.

सचिन पायलट यांच्या पक्षात परतण्याची आशा काँग्रेसने अजूनही सोडलेली नाही. सचिन पायलट यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करत आहेत. आता ही लढाई कोर्टात गेली आहे. पुढच्या काही दिवसात काँग्रेस विश्वासदर्शक ठरावाला सामोरी जाईल. उच्च न्यायालय काय निर्णय घेतं त्यावर पुढची दिशा ठरेल.

Post a Comment

0 Comments