चिंताजनक : पंढरपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ; सोमवारी एकच दिवस नवे 68 कोरोना रुग्ण

पंढरपुर/ प्रतिनिधी: पंढरपुर शहर आणि तालुक्यातील कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. शहरातील लोकवस्ती भागात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.
 कोरोना टेस्ट लॅबमध्ये शनिवारी ६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात ग्रामीण भागातील २० तर शहरातील ४८ नवे रुग्ण एकच दिवसात सापडले आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३५० झाली आहे.  दरम्यान, शुक्रवारी २५ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्जार्च देण्यात आला. बरे होणाऱ्याची संख्या ८७ आहे तर पंढरीत कोरोनाची एकूण संख्या ३५० इतकी झाली आहे. आज एक जणाचा कोरोनामुळे मुत्यु झाला आहे. 
 शनिवारी रात्री पंढरपूर शहर आणि तालुक्यातील ३७४ जणाचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्या ३०६ निगेटिव्ह  तर ६८ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले.
 पंढरपुर शहर आणि तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्णांची संख्या ३५० इतकी झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २५९ इतकी झाली आहे. त्यात पंढरपुर शहर आणि तालुक्यातील रुग्ण आहेत. यामधे पाच जणाचा मुत्यु ही झाला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

Post a Comment

0 Comments