आजरा शहरांमध्य चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवरती शहर 2 दिवस लॉक डाऊन



राकेश करमळकर/आजरा:
     
आजरा शहरांमध्ये कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवरती आजरा तहसीलदार कार्यालय  येथे आजरा नगरपंचायत नगरसेवकांची  तातडीची बैठक घेण्यात आली. शहरांमध्ये तीस तारखेपर्यंत कडक लॉक डाऊन करण्यात येणार आहे. संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत तर आशा सेविका यांच्या मदतीने कंटेनमेंट झोनमधील  वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहे. 

भादवण गावांमधील समूह संपर्क ज्याप्रमाणे रोखला त्याप्रमाणेच आजरा शहरांमधील समूह संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील असे तहसीलदार विकास अहिर यांनी सांगितले. तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या  या बैठकीस सपोनि बालाजी भांगे, आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, नगराध्यक्षा जोस्त्ना चराटी,अशोक चराटी, विलास नाईक, शुभदा जोशी, धनाजी पारपोलकर, आनंदा कुंभार, अभिषेक शिंपी, किरण कांबळे  इत्यादी नगरसेवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments