बार्शी /
९ मे २०२५ रोजी शासनाने पिक विम्यातील केलेले बदल रद्द करून तीन ट्रिगर परत घेऊन चालू खरीप नुकसानीचा पिकविमा मिळावा, पोटखराब, सामूहिक क्षेत्र अशा चुकीच्या त्रुटी काढून वगळलेले तसेच २०२२,२०२३ व २०२४ मध्ये खरीप व रब्बीतील राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा पिकविमा तात्काळ द्या, सर्वच पिकविमा कंपन्यांनी स्थापनेपासून प्रचंड मोठा गैरव्यवहार करून शेतकऱ्यांची लूट केलेली असल्यामुळे यांची न्यायालयीन चौकशी करा, अतिवृष्टीची मदत वाढवून तात्काळ द्या आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील ओरिएंटल विमा कंपनीचे वाकडेवाडी येथील राज्यस्तरीय कार्यालय व महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय, सेंट्रल बिल्डिंग येथे ठिय्या व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले, त्यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सचिन आगलावे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद भालेकर, सुशांत गव्हाणे, दिलीप आगलावे, अविराज आगलावे, सुजित आगलावे, रविकांत पाटील, अक्षय उंबरे, वैजनाथ शिंदे, गंगाधर जाधव, दयानंद गंभीरे, दिगंबर शेळके, दत्तात्र्य अंबुरे, आनंद नरवडे, समाधान जाधव, हनुमंत जगताप, तानाजी माळी, ब्रह्मदेव अंबुरे, राहुल हंगरकर, मुकुंद जाधव, शरद कोंढारे, अनिकेत पाटील, समाधान पाटील, दशरथ भंडारे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
पोट खराब व सामूहिक क्षेत्राच्या नावाखाली वगळलेल्या व राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना पिकविमा आणि अतिवृष्टीची मदत लवकरच देण्याचे मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सांगून सर्व "मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास संबंधित मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचे शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले."
सेंट्रल बिल्डिंग येथील राज्य कृषी आयुक्तालय येथे झालेल्या आंदोलनाचा बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या वतीने तर वाकडेवाडी येथील विमा कंपनी कार्यालयात झालेल्या आंदोलनाचा खडकी पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 Comments