नाद करती काय! याच नर्तिकेमुळे झाडून घेतली गोळी माजी उपसरपंचाचा गेला जीव; झाला गोळीबार



बार्शी तालुक्यातील सासुरे येथे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या लुखामसला गावामध्ये रहिवाशी असलेले माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३४ ) याचे सोबत कला केंद्रात झालेल्या ओळखीचा फायदा घेवुन, प्रेमसंबध ठेवुन वेळोवेळो पैसे, सोन नांण व  नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमिन यापुर्वी घेवुन दिलेली असताना पुन्हा आणखीन भावाचे नावावर ५ एकर शेती कर किंवा गेवराईतील नवीन घर नावावर कर, नाहीतर तुला बोलणार नाही, तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली व पैसे देण्या करीता वारंवार तगादा लावल्याने बर्गे यांना स्वतःच्या बंदुकीने डोक्यात गोळी घालुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यावरून संशयित आरोपी पुजा देविदास गायकवाड ( वय २१ )  रा. सासुरे ता. बार्शी हिच्यावर वैराग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या घटनेची फिर्याद मयताचा मेहुणा लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण  रा .नंदापूर जि. जालना याने वैराग पोलिसात फिर्यादी दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
 
पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या लुखामसला गावामध्ये रहिवाशी असलेले गोविंद जगन्नाथ बर्गे यांना लोकनाट्यकला केंद्र मध्ये कला पाहण्याची आवड होती. सुमारे एक दीड वर्षांपूर्वी ऐका कलाकेंद्रा मध्ये मूळची सासुरे ( ता. बार्शी ) येथील पूजा गायकवाड या नर्तिकी सोबत त्यांची ओळख झाली होती. हळूहळू त्यांचा प्रवास दोघांत मैत्रीचे संबंधातून प्रेमामध्ये गुंतले. यातून अनेक आर्थिक व्यवहार त्यांच्यामध्ये घडल्याचे बर्गे यांच्या नातेवाईकांकडून कळते आहे. सोन्याच्या दागिन्यासह मयत गोविंद यांनी मोठ्या किमतीचा एक मोबाईल देखील पूजाला भेट दिला होता. त्यांचे प्रेम प्रकरण वाढत असतानाच अचानक पूजाने गोविंदशी संपर्क तोडल्यामुळे तो नैराश्याच्या अवस्थेत जाऊ लागला. दरम्यान त्याने वेळोवेळी तिच्याशी संपर्क साधून पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला मात्र यास पूजा प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे गोविंदने गेवराई वरून पूजाचे गाव सासुरे येथे सोमवारी मध्यरात्रीच गाठले होते. दरम्यान सासुरे येथील पोलीस पाटील शीतल करंडे यांनी मंगळवारी सकाळी वैराग पोलिसांना फोन करून सांगितले की प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक चारचाकी गाडी ( एम. एच. २३ बी. एच. ५०२० ) लावली असून गाडीमध्ये एक इसम मयत अवस्थेत आढळून आला आहे. सोबत एक पिस्टल देखील दिसत आहे. वैराग पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळ गाठले. याबाबतची सखोल चौकशी करताच प्रशांत गायकवाड यांनी मयत व्यक्ती गोविंद जगन्नाथ बर्गे हा असून माझ्या बहिणीस भेटण्यास आला आहे असे सांगितले. मात्र तो कधी आला आहे याची मला कल्पना नसून मी सकाळीच त्याला पाहिले आहे. दरम्यान पोलिसांनी गाडी जवळ जाऊन पाहिले असता गाडी लॉक आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या मयताचे नातेवाईकांशी संपर्क साधून दुसरी चावी मागवून गाडीचे लॉक काढले. तेव्हा गाडीमध्ये परदेशी बनावटीचे एक पिस्टल आणि पुंगळी आढळून आली. या पिस्तुलने गोळी मारून घेत गोविंदने स्वतः आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसानी व्यक्त केला आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर , बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, सपोनी विश्वजित जगदाळे व त्यांच्या टीमने भेट दिली.

Post a Comment

0 Comments