कळे गावचे निवास पाटील सेट परीक्षा उत्तीर्ण



कोल्हापूर : कळे ता.पन्हाळा येथील निवास गणपतराव पाटील हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यावतीने 'सहाय्यक प्राध्यापक' पदासाठी घेण्यात आलेली राज्य पात्रता परीक्षा (सेट) राज्यशास्त्र विषयातून उत्तीर्ण झाले आहेत. सध्या ते राज्यशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे, 'कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रामधील वारणा उद्योग समूहाच्या योगदानाचा अभ्यास' या विषयावर संशोधन (पीएचडी) करत आहेत.

आजोबा स्व.श्री.भगवान हरी पाटील तथा मामा (माजी अर्थ व शिक्षण समिती सभापती कोल्हापूर) व वडील स्व.श्री गणपतराव भगवान पाटील (माजी जि.प सदस्य) यांचा त्यांना राजकीय वारसा लाभला आहे. तसेच निवास पाटील एक प्रगतशील शेतकरी तसेच वि.का.स.सेवा संस्था संचालक आहेत. ते अभ्यासू व उदयोन्मुख व्यक्ती म्हणून परिचित आहेत. या यशाने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Post a Comment

0 Comments