कळंब तालुक्यातील खोदला गावातील एक शेतकरी पुरात बेपत्ता झाल्यानंतर नऊ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर त्यांचा मृतदेह बीड जिल्ह्यातील मांजरा नदीकाठी सापडल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर असलेल्या नैसर्गिक संकटांची आणि त्यांच्या असुरक्षिततेची पुन्हा एकदा आठवण करून देते.
शेतकरी कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी खोदला (तालुका कळंब) गावातील सुबराव शंकर लांडगे (वय ६०) पुराच्या पाण्यात बेपत्ता झाले होते. त्यानंतर एनडीआरएफची टीम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि इतर अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली होती. सलग आठ दिवस चाललेल्या या शोधकार्यातून काहीही निष्पन्न न झाल्यानं कुटुंबीय आणि ग्रामस्थ निराश झाले होते.
अखेर २४ ऑगस्ट २०२५ रोजी लाखा (तालुका केज, जिल्हा बीड) येथील मांजरा नदीच्या काठावर लाखा शिवारामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह सापडल्यानंतर प्रशासनाने योग्य प्रक्रिया करून कुटुंबीयांकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आला.
0 Comments