अर्जुन गोडगे |
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांनी भेट घेतली. ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे, कारण तानाजी सावंत मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून नाराज होते. काही दिवसापूर्वी शिंदे यांनी सावंत यांची भेट त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे लवकरच धाराशिव जिल्ह्यात तानाजी सावंत ऍक्टिव्ह मोडवर दिसतील.
तानाजी सावंत हे शिवसेना (शिंदे गट) चे वरिष्ठ नेते आहेत आणि ते भूम-परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना गेल्या दहा महिन्यांपासून मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते जीवनापासून दूर होते. तानाजी सावंत यांनी अचानक अर्जंटपणे भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणात नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत. ही भेट शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष कमी करण्यास मदत करू शकते, परंतु त्याचवेळी इतर नेत्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. या भेटीमुळे सरकारची स्थिरता वाढेल की कमी होईल, हे पुढील काळातच स्पष्ट होईल.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी घेतलेले भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. याशिवाय त्यांचे सख्खे बंधू शिवाजी सावंत यांनी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यामुळे या भेटीला वेगळेच महत्व आहे. या भेटीचे फोटो तानाजी सावंत यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
0 Comments