धाराशिव: उसाच्या संरक्षणासाठी वीज प्रवाहित तार कंपाउंडचा शॉक लागून शेतकरी युवकाचा जागीच मृत्यू...


धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील जेवळी गावातील शेतकऱ्याने उसाचे डुकरा पासून संरक्षण व्हावे म्हणून लावलेल्या वीज प्रवाहित तार कंपाउंडचा शॉक लागल्याने गावातीलच एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

जेवळी गावातील शेतकरी यांनी डुकरा पासून उसाचे संरक्षण व्हावे म्हणून तारेच्या कंपाउंड मध्ये वीज प्रवाह सोडला होता मात्र या तारेला स्पर्श झाल्याने गावातील 32 वर्षीय गुणवंत बलभीम कागे या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली, तारेच्या कंपाऊंडमध्ये करंट सोडणाऱ्या या शेतकऱ्याविरुद्ध लोहारा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास लोहारा पोलीस करीत आहेत. गावातील युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा  पसरली आहे.

Post a Comment

0 Comments