नव्या कृषी मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ


पुणे|

महाराष्ट्राच्या कृषी खात्याची सूत्रे हाती घेताच नवीन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडले आहेत. “वाकडं काम करून ते नियमात बसवतो” असे त्यांच्या तोंडून निघाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या विधानावर टीका करत जोरदार हल्ला चढवला आहे.

माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी करत त्यांना कृषीखात्यातून काढून टाकले आणि त्या जागी अजित पवार यांचे विश्वासू आमदार भरणे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र मंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी केलेल्या विधानामुळे खात्याच्या सुरुवातीलाच वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय.

महसूल विषयक एका कार्यक्रमात बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, “कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात, पण वाकडं काम करून ते नियमात बसवतो, त्याची माणसं ठेवतात…” या विधानावरूनच विरोधकांनी टीकास्त्र चालवले आहे. विरोधकांचा सवाल आहे की, “वाकडं काम करून ते नियमात बसवणं हीच आता नवीन कृषी धोरण असेल का?”. अनेक नेत्यांनी अशा ‘वाकड्या’ कामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे, आणि याच मुद्द्यावरून विरोधकांनी भरणेंना चिमटा काढायला सुरुवात केली आहे.

Post a Comment

0 Comments