शुभमन गिल लवकरच टी-20 आंतरराष्ट्रीय संघात परतण्याची शक्यता आहे. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन असलेल्या गिलची आशिया चषक स्पर्धेसाठी निवड निश्चित मानली जातीय. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होणार आहे.
गिलनं टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून पहिल्याच सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानं इंग्लंड विरुद्धच्या 5 टेस्टमध्ये 754 रन्स काढले. तसंच टीम इंडियानं ही सीरिज 2-2 अशी बरोबरीत रोखली. RevSportz च्या वृत्तानुसार, गिल केवळ टी-20 आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करणार नाही, तर त्याला या स्पर्धेसाठी व्हाईस कॅप्टन बनवले जाण्याची शक्यता आहे
सूर्यकुमार यादव या स्पर्धेसाठी तंदुरुस्त असणार आहे, जी यावर्षी टी-20 फॉरमॅटमध्ये खेळली जाईल. शुबनन गिल या टीमचा व्हाईस कॅप्टन असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी टी-20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी निवृत्ती घेतली. त्यानंतर अक्षर पटेल T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन आहे.
0 Comments