स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्पर कारवाईत तिघांना अटक; लातूर जिल्ह्यातून मुलगी वाचवली
धाराशिव |
धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (L.C.B) तातडीने व अचूक कारवाई करून पुण्यातून अपहरण झालेली अंदाजे दोन वर्षांची मुलगी सुरक्षितपणे शोधून काढली. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, अपहृत मुलगी सुखरूप सापडल्याने नागरिकांतून पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंगवर असताना, पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री. निलेश मोकाशी यांनी धाराशिव पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली की, पुणे येथून दोन वर्षांची मुलगी अपहरणास गेलेली आहे. या संदर्भात धाराशिव गुन्हे शाखेने स्वतंत्र तपास सुरू केला.
गुप्त माहितीच्या आधारे यशस्वी सापळा:
पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तुळजापूर येथे राहणाऱ्या सुनिल सिताराम भोसले याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता, त्याने अपहरणात सहभागी इतर साथीदारांची नावे उघड केली – शंकर उजण्या पवार व शालुबाई प्रकाश काळे. त्यानंतर पोलीस पथकाने लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथे छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले आणि अपहृत चिमुकलीला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
कामगिरीतील प्रमुख अधिकारी व कर्मचारी:
या यशस्वी कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात खालील अधिकाऱ्यांनी कामगिरी बजावली:
सपोनि अमोल मोरे, सपोनि सचिन खटके. पो.ह. विनोद नराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पो.ना. बबन जाधवर चालक पोह/ महेबुब अरब
अटक आरोपींची माहिती:
1. सुनिल सिताराम भोसले (वय 51, रा. तुळजापूर)
2. शंकर उजण्या पवार (वय 40, रा. हासेगाव, जि. लातूर)
3. शालुबाई प्रकाश काळे (वय 35, रा. तुळजापूर)
4. अपहृत मुलगी: कोमल धनसिंग काळे (वय 2 वर्षे)
पुढील कारवाई:
सर्व आरोपी व मुलगी यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, भारती विद्यापीठ पो.ठा. येथे पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
0 Comments