बार्शी-परांडा रस्त्यावर भीषण अपघात; खांडवीतील दोघेजण जागीच ठार


बार्शी |

खांडवी-पिंपरी रस्त्यावरील वाणेवाडी (ता. परांडा, जि. धाराशिव) परिसरात ३१ जुलै राजी दुपारी अडीच च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळीच रक्ताचा सडा पडला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणेः दत्तात्रय किसन उर्फ कृष्णा गव्हाणे, वय ३५ वर्षे राजकुमार विश्वनाथ भाकरे, वय ३७ वर्षे (दोघेही राहणार खांडवी, ता. बार्शी)

अपघातानंतर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने मामा हॉस्पिटल, बार्शी येथे हलविण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दाखल करतानाच मृत घोषित केले. दोघांचेही मृतदेह ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच बार्शी शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून आवश्यक कागदोपत्री कार्यवाही केली. हा अपघात परांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे पुढील तपासासाठी प्रकरण परांडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

सदर अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू असून, प्रारंभिक अंदाजानुसार वाहनाचा ताबा सुटणे अथवा अतीवेग ही कारणे असू शकतात. या दुर्दैवी घटनेमुळे खांडवी गावात शोककळा पसरली असून दोघेही तरुण घरातील आधारस्तंभअसल्यामुळे त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

0 Comments