ऑनलाईन रमीच्या नादात 80 लाखांचं कर्ज, घरदार, शेती सगळं काही गमावलं, करमाळ्यातील 26 वर्षांच्या जयचे...


'हल्ली टीव्हीवर पाहा किंवा सोशल मीडियावर एक दुसरी जाहिरात ही ऑनलाईन गेमिंगचीच असते. एखादी म्हातारी बाई येते आणि मी रम्मी खेळून २ कोटी रुपये जिंकले असं सांगतेय. बरं हे कमी की काय मराठी, हिंदीचे अभिनेते हे रम्मी कसं खेळायचं याची जाहिरात बाजीही करतात. गमंत म्हणजे, अलीकडे तर अभ्यास करून खेळा, असा अजब सल्ला देणारे अभिनेते खुशाल जाहिराती करताय.

 पण रिअल लाईफमध्ये या ऑनलाईन रम्मी आणि इतर गेमच्या नादी जाऊन अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडध्ये एका तरुणाने ऑनलाइन रम्मीच्या नादात ८४ लाखांचं कर्ज केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. 

पिंपरी चिंचवड मध्ये राहणारा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील तरुण जय जाधव याचीही कहाणी आहे. जय जाधव हा रिअल इस्टेट व्यवसायात काम करतोय. पण त्याला एका मित्राने त्याला रम्मी खेळण्याचा नाद लावला अन् बघता बघता त्याने थोडे फार नाहीतर तब्बल ८४ लाखांचं कर्ज केलं. रिअल इस्टेटच्या व्यवसायातून जयने उभे केलेले 23 लाख, मित्रमंडळीकडून घेतलेलं 20 लाखांचं कर्ज, एवढंच नाही तर गावाकडील दीड एकर शेती आणि स्कॉर्पिओ गाडी गहाण ठेऊन त्यानं 20 लाखांचं कर्ज उचललं होतं.

Post a Comment

0 Comments