बार्शी |
ममता प्राथमिक शाळा, सुभाषनगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून एक विशेष योग शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमात शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापकांच्या हस्ते सरस्वती पूजनाने व शांती मंत्राने झाली.
यानंतर शिवाजी महाविद्यालय बार्शी मधून योग मध्ये ऑल इंडिया स्तरावर नावलौकिक मिळवलेली ममता प्राथमिक शाळेची माजी विद्यार्थिनी योगा प्रशिक्षक दिशा परदेशी व निशा परदेशी यांनी विविध योगासनांचे महत्त्व सांगितले आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, प्राणायाम यांसारखी योगासने आत्मीयतेने केली.विद्यार्थ्यांना सुलभ व उपयोगी योगासने शिकवली. प्राणायाम, सूर्यनमस्कार व ध्यान यासारख्या क्रियांमधून विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावले गेले.
रोहन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, "योग केवळ एक शारीरिक क्रिया नाही, तर तो जीवनशैलीचा एक भाग आहे. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच योगाची सवय अंगीकारावी." तसेच , “नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राहते. विद्यार्थ्यांनी रोज योगा करण्याची सवय लावावी.”
कार्यक्रमाच्या शेवटी जावेद पठाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांकडून ‘योग दिन’चा संकल्प घेतला आणि ‘योगा फॉर वेलनेस’ हा संदेश दिला.
कार्यक्रमात पालकही उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे योगासने करून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ ठोंबरे यांनी परिश्रम घेतले
0 Comments