सोलापूर: वैराग शहरांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा, अल्पसंख्यांक नेते बाबा शेख यांचा आंदोलनाचा इशारा


 वैराग |

 शहरातील मुख्य रस्ता बकाल झालेला असून या रस्त्यावरून वहानात दवाखान्यासाठी एखादी गरोदर  महिला  घेवून जात असतील तर ती या रस्त्यातच वहानात प्रसुती होईल असे वैराग शहरातील मुख्य रस्ते झालेले आहेत. हे आपणास माहित असतांना आजतागायत या रस्त्याबाबत कांहीच केलेले नाही असे दिसते.

याच बरोबरच वॉर्ड क्र. १४ या वॉडतिल रस्तेही नाहीत व गटारी ही नाहीत या वॉर्डमध्ये माणसे राहतात का  नाही हे समजून येत नाही, कारण या वॉर्डात आजतागायत कोणत्याही सार्वजनिक सुविधा मिळालेल्या नाहीत . तसेत शारदादेवीनगर, पंचशीलनगर, याठिकाणीही या सुविधा होणे गरजेचे आहे . त्याचबरोबर सिध्दार्थनगर, अण्णाभाऊ साठे नगर, व इतर ठिकाणी गटारी नादुरूस्त असल्यामुळे पाणी साठत असल्यामुळे त्यामध्ये डासांचे प्रमाण वाढलेलेले असल्यामुळे रोगराईचे प्रमाण हे वाढत आहे. 
जर या सार्वजनिक सुविधा हया दि. २०/६/२०२५ पर्यंत सुरू करून दिल्या जाव्यात कारण लवकरच वैरागची यात्रा सुरू होणार असून जर आपण यावर कांहीच कार्यवाही केली नाही तर दि. ३०/६/२०२५ रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास असणार आहे .

तसेच वैराग नगरपंचायत स्थापन झालेपासून वैराग शहरात कोणत्याच सुविधा मिळालेल्या नसल्यामुळे नैतिकतेने त्याची जबाबदारी ही वैराग नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी घेवून त्यांनी राजीनामा दयावा किंवा आपली बदली तरी करून घ्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक बार्शी तालुका अध्यक्ष ताजोद्दीन ( बाबा ) शौकत शेख सुरज कांबळे अजय काळे संजय कांबळे दाऊद कांबळे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments