धाराशिव – धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी रितू खोकर यांची नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रितू खोकर यापूर्वी सांगली जिल्ह्यात अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या.
नवीन पदभार स्वीकारल्यानंतर रितू खोकर यांच्यासमोर तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण तसेच जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी ही मोठी आव्हाने असणार आहेत. दुसरीकडे, संजय जाधव यांना सध्या कोणतीही नवीन नियुक्ती देण्यात आलेली नाही. मात्र, त्यांना लवकरच स्वतंत्र पदावर नियुक्त करण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
रितू खोकर या हरियाणातील पाणीपत जिल्ह्याच्या रहिवासी असून, त्या 2018 च्या युपीएससी बॅचमधील अधिकारी आहेत. त्यांचे वडिल गावाचे माजी सरपंच होते.
0 Comments