आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रविराज चव्हाण यांनी आज कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन देवींची ओटी भरत कुलधर्म कुलाचार करून देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची गदा अर्पण केली. रविराज चव्हाण हे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहेत. त्यांनी तुर्की येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीस्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. २३ वर्ष वयोगटातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतही त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते.
रविराज चव्हाण हे पंढरपूर येथील रहिवासी असून ते आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाला आले होते.
मंदिर संस्थानच्या वतीने पैलवान रविराज चव्हाण यांच्या कुटुंबीयांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी दिनेश निकवाडे, सहायक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार, सहायक स्वच्छता निरीक्षक नितीन भोयर, लिपीक महेश गंजे, पुजारी अण्णासाहेब क्षीरसागर व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments