धाराशिव: चिरीमिरीच्या मोहापाई डाटा एन्ट्री ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात, ३००० रुपयाच्या लाचेची सर्वत्र चर्चा


धाराशिव | 

तुळजापूर तालुक्यातील एका गावामध्ये शेतकऱ्याने तुतीची लागवड केली होती त्या तुतीच्या लागवडीचे मनरेगा अंतर्गत मस्टर काढण्यासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटरला तीनशे रुपयाची लाज घेताना लाच लुचपतप्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले आहे. कृषी अधिकारी कार्यालयातील कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर अतुल देशमुख यांच्यावर तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कृषी अधिकारी कार्यालय तुळजापूर येथे रेशम उद्योग लागवडीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. एका शेतकऱ्याचे 27,621 21 रुपयाचे बिल काढण्यासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटरने तीनशे रुपयाची लाच मागितली. शेतकऱ्यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. डाटा एन्ट्री ऑपरेटर ला एसीबीने 300 रुपयाची लाच घेताना पंचा समक्ष पकडले.

सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आमदार दिनकर उमलमुगले, सचिन शेवाळे, नागेश शेरकर व शशिकांत हजारे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments