सोलापूर- जिल्हाधिकारी कार्यालय येथे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी तालुक्यातील नागरिकांच्या प्रशासनाकडील तक्रारींच्या निवारणासाठी महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत पूर्वीच्या तालुकास्तरीय बैठकीतील 113 तक्रारी तसेच नव्याने प्राप्त झालेल्या 23 तक्रारी, अशा एकूण 136 तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रलंबित असलेल्या कामांवर त्वरित कार्यवाही करत नागरिकांना दिलासा देण्यास खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यशस्वी ठरले.
मुख्य तक्रारी आणि त्यांचे निराकरण:
बार्शी तालुक्यातील नागरिकांकडून तहसील कार्यालय, सोयाबीन अनुदान, पीक विमा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण व कृषी विभाग यांसारख्या विषयांवर प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारींवर सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीने उपाययोजना करण्यात आल्या.
बैठकीस उपस्थित अधिकारी:
या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी मीनाक्षी सिन्हा, निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार मॅडम, उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) , कृषी अध्यक्ष भोसले, सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार भोसले, बार्शी तहसीलदार व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रशासनाने तत्परता दाखवावी व भविष्यात अशा तक्रारी प्रलंबित राहू नयेत यासाठी प्रभावी प्रणाली विकसित करावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
0 Comments