परंडा प्रतिनिधी -
‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’ हे गाणं तुमच्या अनेकांना आठवतं असेल. विशेषत: दिवाळी सणाच्या वेळी या गाण्याची अनेकांना आवठण होते. भारतात विविध पद्धतींनी दिवाळीची सुरुवात होते. मात्र महाराष्ट्रात वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते. यंदा सोमवार, २८ ऑक्टोबर (सोमवार) रोजी अश्विन कृष्ण एकादशीला गोवत्स द्वादशी, वसुबारस सण साजरा होत आहे. वसुबारसच्या दिवशी गाई व वासरांची पूजा केली जाते. त्या माध्यमातून गाईविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
याच अनुषंगाने गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य व सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी यांच्या वतीने गाव तिथे गोमाता वसुबारस या उपक्रमांतर्गत दिवाळीची सुरुवात वसुबारस हा सण गाईचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी पाटील परिवाराच्यावतीने गो माता पूजन करण्यात आले. गाय आणि वासरांच्या अंगी असणारी वात्सल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी हे सर्व आपणास लाभो असा दिपावली शुभ संदेश श्रीमंतराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड रणजीत महादेव पाटील यांच्या वतीने देण्यात आला.
या प्रसंगी पाटील परिवार उपस्थित होता.
0 Comments