तीन हजाराची लाच मागणारा मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या अडकला जाळ्यात


मराठा आरक्षणाच्या पार्श्वूमीवर कुणबी जात प्रमाणपत्राच्या अनुषंगाने प्राप्त कागदपत्राची पडताळणी करून अहवाल देण्यासाठी तीन हजाराची लाच मागून तडजोड करून एक हजार घेतल्याचे कबूल करणाऱ्या मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करून केली असून त्यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शंकर विठ्ठल केकाण वय ५५ वर्षे, पद मंडळ अधिकारी, नेमणूक मंडळ अधिकारी कार्यालय केत्तुर, ता. करमाळा जि. सोलापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांचे मुलीचे कुणबी जात प्रमाण पत्राच्या अनुषंगाने प्राप्त कागदपत्रांवरुन पडताळणी करुन अहवाल देण्याकरीता यातील आलोसे श्री केकाण, मंडळ अधिकारी केत्तुर यांनी तक्रारदार यांचेकडे ३,००० रु. लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १,००० रुपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.

सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर पोलीस अंमलदार पोहवा अतुल घाडगे, पोशि सचिन राठोड, गजानन किणगी, सलिम मुल्ला व चालक सुरवसे व गायकवाड सर्व नेम. एसीबी, सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे

Post a Comment

0 Comments