मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील दिवसेंदिवस सरकारला चॅलेंज देत आहेत. परंतु आता सरकारमधील काही मंत्री आमदार देखील मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात जाहिर भूमिका घेतांना दिसत आहेत.
यातच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटलांना जाहिर आव्हान दिले आहे. मनोज जरांगे पाटलांनी राजेंद्र राऊतांच्या घरासमोर सभा घेण्याचे आवाहन दिले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तसेच ज्या दिवशी मराठ्यांसोबत गद्दारी करेन, त्या दिवशी फाशी घेऊन असे जाहिर विधान राजेंद्र राऊतांनी केले आहे.
यावेळी ते म्हणाले की, मराठा समाजाचा तुमचा आदर केला. तुमचा मानसन्मान केला. उगाचच मराठा समाजाच्या वाट्याला जायचं म्हणून सर्व मंत्रीसंत्री गप्प बसले आहेत. तुमच्या शिव्या खातात, आयमाय काढतात. या राजद्रोहाला असं तसं असे म्हणत मलाही शिकवायला लागले आहेत. आरक्षणाची गरज माझ्या बायकोसह आईबापाला देखील माहिती आहे. माझ्या आईबापाने आणि बायकोनी तुमचं काय केले ? ते तुम्हाला काहीबोलले का ? मीच तरी काही बोललं आहे का ? आता बार्शी तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी विचारलेले प्रश्न तुम्हाला झोंबले असतील. दादा मी देखील छत्रपतींचा मावळा आहे. माझ्याही घराण्याने या हिंदवी स्वराज्यसाठी छत्रपतींच्या गादीसाठी रक्त सांडलं आहे. इतिहास बघा.
मी देखील मराठा समाजासाठी रक्त सांडलं आहे, तेही बघा. जरी तुम्हाला खूमखूमी असेल तर राजा राऊतच्या दारात सभा घ्यायची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आहेत. देवेंद्र फडणवीस ब्राम्हण आहेत. अजितदादा मराठा आहेत. जर तुमच्या मनात महायुती सरकार पाडून महाविकास आघाडी सरकार आणायचं असेल तर जर खरंच तुम्ही मराठा समाजाच्या गरजवंत पोरांसाठी लढत असाल तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या. लोकसभेत महाविकास आघाडीला तुम्ही झुकतं माफ दिले. त्यांच्याकडून लिहिन घ्या. असेही चॅलेज त्यांनी दिलं आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार कसे लिहिन देत नाहीत ते मी बघतो. जर त्यांनी लिहिन दिलं नाही तर राजाभाऊ राऊतचा राजकीय सन्यांस जाहीर असेही त्यांनी म्हटले.
त्यानंतर माझा राजकारणाचा काहीही संबंध नाही. परंतु महाविकास आघाडीकडून लिहिन आणण्याची जबाबदारी तुमची. जर या तिघांनी लिहिन दिलं नाही तर तुम्ही देखील प्रमाणिक भूमिका घ्या. असे झाल्यास माझ्या घरी चहा पेढ्याचा घास भरवतो. या छत्रपतीच्या मावळ्याला डवचायचा प्रयत्न केला तर राजाराम राऊत म्हणतात मला. काय परिणाम होईल याची नोंद आख्खा इतिहास नोंद करेल. माझं डोकं फिरवू नका तुम्ही. ज्या दिवशी मी मराठ्यांसोबत गद्दारी करेन, त्या दिवशी फाशी घेईल. असं जाहिर अभिवचन देतो. जरांगे दादा फक्त प्रमाणिक मराठा म्हणून माझ्या दारात यायचं. जर तुम्ही खोबार्डीची भूमिका केली तर यापेक्षाही मोठी शिक्षा भोगावी लागेल. कोण मराठ्याचा माणूस बोलत नव्हता. परंतु आज राजाराम राऊत छाती ठोकून बोलत आहे. तुम्ही या पन्नास लाख खर्च करून तुमची जाहिर सभा आयोजित करण्याची जबाबदारी माझी आहे. असेही ते म्हणाले.
0 Comments