बार्शी |
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आमदारांना काहीही बोलता, मी तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर माझ्याबद्दल ही काहीही बोललात हाच का तुमचा सुसंस्कृतपणा आहे का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर आपल्याला शिवरायांनी हीच शिकवण दिली का? असा रोखठोक सवाल आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगेंना केला त्यावर आज मनोज जरांगे यांनी उत्तर देताना त्यांचा बोलवता धनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं म्हटलं आहे.
'त्याचबरोबर जर ज्या मराठ्याच्या छाव्याला डिवचायचा प्रयत्न केला तर आमचं घराणे हे मराठे आणि हिंदवी स्वराज्यसाठी रक्त सांडणारे घराणे आहे. खंडोजी खोपडेच्या भूमिकेत याल तर राजा राऊत म्हणतात मला, काय परिणाम होतील याची नोंद संपूर्ण महाराष्ट्र करेल, माझं डोकं तुम्ही फिरवू नका. मी जर मराठ्यांची गद्दारी केली तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो बार्शीतील पांडे चौकात फाशी घेईन, प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात आलात तर पेढा भरवीन पण खंडोजी खोपडेच्या भूमिकेत आलात तर मोठी शिक्षा भोगावी लागेल हे राजा राऊतचं चॅलेंज आहे, कोण मराठा बोलत नव्हता पण हा पठ्या बोललाय आज, किती तुकडे व्हायचे आणि किती करायचे याचं भान मला ही राहणार नाही', अशा शब्दात छाती बडवत आमदार राजेंद्र राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे यांना दम भरला होता त्यावर मनोज जरांगे 'मला काढायचं होतं उकरून ते गेलं बरळून' असं म्हणालेत.
0 Comments