नंदुरबारमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्या बापाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीची प्रकृती खराब झाल्यानंतर तिला डॉक्टरकडे नेण्यात आले त्यावेळी हा संपूर्ण प्रकार समोर आला.
धक्कादायक बाब म्हणजे मुलगी गर्भवती राहिली आहे. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे ही घटना घडली.आईच्या तक्रारीनंतर बापाविरोधात शहादा पोलिस ठाण्यामध्ये बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या घटनेमुळे नंदुरबारमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक देखील केली. या घटनेवरून घरामध्येच मुली सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर नंदुरबारमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
0 Comments