राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यातील नेतेमंडळींच्या सभा, दौरे व गाठीभेटींना प्रचंड वेग आला आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघ प्रचंड गाजला आहे. अशातच आता येत्या विधानसभेला देखील बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार परळीमध्ये पुन्हा एकदा मराठा कार्ड खेळणार का अशा चर्चा रंगल्या आहे.
शरद पवार धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढवणार? :
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे आज शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. कारण आगामी विधानसभेसाठी राजेसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात असल्याचं दिसत आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे परळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. तसेच आगामी काळामध्ये राजेसाहेब देशमुख हे शरद पवार यांच्या पक्षांमध्ये पक्षप्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता बीड परळी या भागात मराठा समाज बांधवांनी आरक्षणाचा लढा उभा केला आहे.
राज्यात देखील मराठा आरक्षणाचा बीड, जालना हा भाग केंद्रबिंदु ठरला होता. त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भात राज्यात असलेल्या राज्य सरकारच्या भूमिका आणि मराठा समाजाची आरक्षणाची मागणी यांच्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील मोठा बदल होण्याची दाट शक्यता आहे.
अशातच मनोज जरांगे पाटील यांनी देखील विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याबाबत काही निर्णय घेतला तर जिल्हापातळीवर काही समीकरणं देखील बदलण्याची शक्यता आहे. अशातच परळीमध्ये महायुतीकडून धनंजय मुंडे तर महाविकास आघाडीकडून राजेसाहेब देशमुख यांना संधी दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शरद पवार आणि राजेसाहेब देशमुख यांच्या भेटीमुळे राजकारणात अनेक तर्क- वितर्क लावले जात आहेत. तसेच आता शरद पवार हे पुन्हा एकदा परळीमध्ये मराठा कार्ड खेळणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
0 Comments