महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेमुळे राजकारणही चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.
नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यक्रम संपन्न होत आहे. यावेळी बोलताना माझी लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी सरकारवर केलेल्या हल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे.
तुम्ही फक्त महायुतील साथ द्या, लाडकी बहीण योजना कुणी माईचा लाल बंद पाडू शकणार नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
ही योजना आम्ही पुढील पाच वर्ष सुरू ठेवू- अजित पवार
लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर पर्यंतचे पैसे तुम्हाला मिळतीलच. मात्र नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होईल. आम्ही तिघे कुठे धनुष्यबाण, कुठे कमळ, तर कुठे घड्याळ या चिन्हावर 288 जागांवर उभे राहू. त्यावेळी तुम्ही महायुतीला भरभरून मतदान करा. मी शब्द देतो, ही योजना आम्ही पुढील पाच वर्ष सुरू ठेवू, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या, असं आवाहनही अजित पवार यांनी बोलताना केलं आहे.
विरोधक या महत्वाकांशी योजनेचे टिंगल टवाळी करत होते. योजनेवर शंका व्यक्त करत होते. हे विरोधक एवढे वर्ष सत्तेत होते, तेव्हा तुम्हाला का नाही सुचले महिलांना मदत करण्याचे? तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले काही विरोधक आमच्यावर टीका करत आहेत, असं अजित पवारांनी म्हटलं.
आता या योजनेत जवळ जवळ 1 कोटी 60 लाख बहिणी लाभार्थी झाल्या आहेत. अजून पुढचे टप्पेही लवकरच होणार आहे. ज्यांच्या अर्ज राहिल्या आहे, त्यांनी अजून ही अर्ज करावे. आम्ही तो लाभ त्यांना देऊ, असं अजित पवार म्हणालेत.
0 Comments