पिकविमा कंपनीत झालेल्या "भजन" आंदोलनातून दिला इशारा
पुणे/बार्शी |
२१ऑगस्ट, २०२४ खरीप व रब्बीचा २०२३ मधील राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांचा पिक विमा वसूल करण्यासाठी, पुणे, वाकडेवाडी येथील ओरिएंटल पिकविमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे रात्री अकरा वाजेपर्यंत भजन आंदोलन सुर होते. त्यावेळी गायकवाड म्हणाले की, सरकार एका बाजूला शेतीविरोधी कायदे रद्द करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची करोड रुपयाची लूट होत आहे, तर दुसऱ्या बाजूला पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडवत असताना, सरकार मात्र लाडक्या बहिणीला नुसते दीड हजार रुपये देऊन तिच्या नवऱ्याच्या हातामध्ये इन्ट्रेलचा डबा देत असल्यामुळे लाडक्या बहिणीचा नवरा सरकार व पिकविमा कंपनीच्या उरावर बसल्याशिवाय गप्प बसणार नाही असा खणखणीत इशाराही यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गायकवाड यांनी दिला.
त्यावेळी तानाजी साळुंखे, अमोल खुणे, अमोल जगदाळे, रवींद्र जगदाळे, नंदकुमार जगदाळे, किसन जगदाळे, शरद जगदळे, प्रमोद जगदाळे, दत्ता पाटील, भाऊसाहेब तांबे, तुकाराम खुणे, शिवाजी वाघमोडे, भगवान वाघमोडे, सुधाकर पवार, विक्रम खुणे, शिवाजी खुणे, अभिजित खुणे, लखन जाधव, कैलास पवार, नामदेव खुणे, दादासाहेब शिराळ, शंकर बेताळे, बालाजी उघडे, पांडुरंग खुणे, चिमू खुणे, श्रीनिवास खुणे, अजित सिरसट, प्रदीप पाटील, विजय सातपुते, रोहित गीते, रोहित पाटील, शरद पाटील, बापू जाधव, ओंकार जाधव, योगेश पाटील आदींसह बहुसंख्य शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आंदोलनाच्या भीतीमुळे कंपनीच्या व्यवस्थापकांनी लागलीच खडकी पोलिसांना पाचारण केले. रात्री अकरावाजेपर्यंत चाललेल्या या आंदोलनानंतर पिक विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित यांनी दोन महिन्यांमध्ये राज्यातील उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
0 Comments