नताशाने ‘एक्स’ बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप का केला? बॉयफ्रेंडने सांगितलं यामागचं कारण



 भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा स्टँकोविकने काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर नताशा स्टँकोविक कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत आहे. नताशा स्टँकोविक ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते, ती तिच्या चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करत असते. अशातच तिने हार्दिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती पुन्हा भूतकाळातील रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे.

नताशाच्या एक्स बॉयफ्रेंडने सांगितलं ब्रेकअप मागचं कारण :
हार्दिकच्या आधी नताशा स्टँकोविक टीव्ही अभिनेता अली गोणीला डेट करत होती. या दोघांनी ‘नच बलिए’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये देखील एकत्र भाग घेतला होता. ते दोघे बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांचं काही कारणास्तव ब्रेकअप झालं होतं. अशातच आता या नात्यावर आणि ब्रेकअपवर खूप दिवसांनी अलीने मौन सोडलं आहे.

अली गोणीने कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली होती. या मुलाखतीत दोघांनी अलीला त्याच्या पर्सनल आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले आहेत. अली सध्या अभिनेत्री जास्मीन भसीनला डेट करत असल्याची माहिती मिळत आहे. अलीने त्यांच्या नात्याविषयी माहिती देताना म्हणाला की, “जास्मीन आणि तिच्या कुटुंबीयांसोबत माझं खूप चांगलं नातं आहे. ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवत आहे. तसेच तिच्या कुटुंबात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ती प्रत्येकाची आवडती आहे.”
 
यावेळी अलीला त्याच्या भूतकाळातील नताशा स्टँकोविकच्या रिलेशनशिपबद्दल विचारल्यास तो म्हणाला की, “जास्मीनच्या आधी माझं नातं फार काळ टिकू शकलं नाही. कारण तिच्या प्रचंड वेगवेगळ्या मागण्या होत्या. मात्र मी तिच्या मागण्यांना स्वीकारू करू शकलो नाही. तसेच तिने अट देखील ठेवली होती की, लग्नानंतर ती माझ्या कुटुंबीयांसोबत राहणार नाही आणि मला कोणत्याही परिस्थितीत कुटुंबीयांना सोडणं शक्य नव्हतं. त्यामुळे आमचं नातं टिकू शकलं नाही.

मात्र यावेळी अलीने स्पष्टपणे नताशाचं नाव घेतलं नाही, पण तो तिच्याचबद्दल बोलत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण जास्मीनच्या आधी अली नताशा स्टँकोविकलाच डेट करत होता. तसेच आत्ता मी माझ्या कुटुंबाला सोडू शकत नाही. कारण मी त्यांच्यासोबतच राहत आहे आणि यापुढे देखील त्यांच्यासोबतच राहणार आहे. त्यामुळे या जगातील कोणतीही शक्ती मला माझ्या घरच्यांपासून वेगळं करू शकत नाही असंही त्याने स्पष्ट केलं आहे

Post a Comment

0 Comments