Sonakshi Sinha | लग्नाआधीच सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट?बॉलिवुडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालसोबत लग्न बंधनात अडकली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर या स्टार कपलने एकदम खासगी पद्धतीने लग्नाची नोंदणी केली.

लग्नानंतर सोनाक्षीने आपल्या जवळच्या मित्रांसाठी खास रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

अशात सोनाक्षीबद्दल वेगळ्याच चर्चा रंगताना दिसत आहेत.लग्नाच्या काही दिवसांनीच सोनाक्षी रुग्णालयात दाखल झाली होती. यानंतर विविध चर्चा रंगल्या.सोशल मीडियावर तर, सोनाक्षी प्रेग्नंट असल्याचंही म्हटलं गेलं. आलिया भट्ट हिच्याप्रमाणेच लग्नाच्या अगोदरच सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर एका यूजरने सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट असल्याचं लिहिलंय. सोनाक्षी सिन्हा ही प्रेग्नंट असून लवकरच ती आपल्या प्रेग्नंसीची घोषणा देखील करेल. वडील शत्रुघ्न सिन्हा यांची तब्येत खराब असताना देखील सोनाक्षी सिन्हाने झहीरसोबत घाईमध्ये लग्न केले, कारण ती प्रेग्नंट होती. असा दावाच या युझरने केलाय.

पाहायला गेलं तर, सोनाक्षी ही रुग्णालयात तिच्या वडिलांना बघायला गेली होती. सोनाक्षीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यांना बघायलाच सोनाक्षी नवरा झहीरसोबत तेथे गेली होती आणि सोनाक्षीनेही प्रेग्नंन्सीबाबत अधिकृत अशी कोणतीच माहिती अद्याप दिलेली नाहीये.

दरम्यान, सोनाक्षीच्या लग्नावेळी शत्रुघ्न सिन्हा नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सोनाक्षीच्या नात्याला त्यांनी विरोध केल्याचं देखील म्हटलं गेलं. मात्र, शत्रुघ्न सिन्हांनी  ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. शिवाय ते लग्नात आनंदी देखील दिसत होते. “माझ्या मुलीने काहीही बेकायदेशीर किंवा असंवैधानिक काम केलेलं नाही. लग्न दोन लोकांमधील खासगी निर्णय आहे. कोणाला देखील यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.”, असं शत्रुघ्न सिन्हा एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

Post a Comment

0 Comments