लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठं यश मिळालं. तर, अजित पवार गटाचा लाजीरवाणा पराभव अद्यापही अजित पवारांना पचनी पडलेला नाही. अशातच आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक आमदार आणि नगरसेवक हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचे आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती दिली होती. तसेच जयंत पाटील यांनी देखील याबाबत भाष्य केलं होतं.
17-18 नगरसेवक हे शरद पवारांच्या संपर्कात
अशातच आता पिंपरी-चिंचवड येथील 17-18 नगरसेवक हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर आता रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवारांची प्रतिक्रिया
रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवक हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक नेत्यांना शरद पवार साहेबांचं काम करायचं असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. अजित पवार गटातील नगरसेवक हे लवकरच जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
दहा दिवसांमध्ये 35 लोकांचा प्रवेश होणार आहे. पिंपरी-चिंचवड येथे अख्खा महाराष्ट्र वसला आहे. शरद पवार , राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर लोकांचा विश्वास असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. आमच्याकडे येणारे गर्दी नाहीतर दर्दी लोकं आहेत, असं रोहित पवार म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यातील शिंदे सरकार हे फसवं सरकार आहे. मनसे अचानक का जागी झाली आहे? निवडणूक आली की ते जागे झाले. पिंपरी-चिंचवड येथील नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शरद पवारांची आणखी ताकद वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बरेच नेते आमच्या पक्षात येणार असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे
0 Comments