मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शरद पवार आहेत काय?, स्वतः पवारांनी केलं मोठं भाष्य


राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज (17 जुलै) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. राज्यात आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका होतील. यासाठी राज्यातील नेत्यांकडून निवडणुकीसाठीची चाचपणी केली जात आहे. अशात शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं भाष्य केलंय.

“आम्ही विधानसभा निवडणूक सोबत लढणार आहे. काही कार्यक्रम घेऊन जाणार आहोत. तो कार्यक्रम घेताना फार मोठा मॅनिफेस्टो ठेवावा असं वाटत नाही. नेमका आणि टू द पॉइंट अशा ठराविक गोष्टी घेऊन एकत्रित प्रयत्न करु. कालच्या निवडणुकीत जी कमतरता होती ती दुरुस्त करावी, हे सूत्र  सोबत घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय”, असं शरद पावर म्हणाले.

“मोदींनी विधानसभा निवडणुकीतही सभा घ्याव्यात”
तसंच, “जनतेला आता बदल पाहिजे आहे. तो बदल आमच्यादृष्टीने अनुकल झाला, तर काहीही झालं तर आम्ही पाच वर्ष सरकार उत्तम चालवू. त्यात नेतृत्वाचा प्रश्न येणार नाही. मी कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवणार नाही.”, असं शरद पवार म्हणाले आहेत. यातून त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत त्यांचं नाव नसल्याचं स्पष्ट केलंय.

यावेळी त्यांनी भाजपावर देखील निशाणा साधला. “राज्यात मोदींच्या अनेक सभा झाल्या.त्यातील चार जागा सोडल्या तर इतर ठिकाणी आम्हाला यश आले. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यानही सभा घ्याव्यात. महाराष्ट्राला अधिक मार्गदर्शन करावं.”, असा टोला देखील यावेळी शरद पवारांनी लगावला.

या दरम्यान, शरद पवारांनी ‘लाडकी बहीण योजने’वरही प्रतिक्रिया दिली. बहीण भावाचा विचार होतोय ही चांगली गोष्ट असून याचा आनंद आहे. लोकसभेत मतदारांनी जे मतदान केलंय त्याचा हा चमत्कार आहे. मतदारांनी मते व्यवस्थित दिली तर बहीण आणि भाऊ सर्वांना आठवतील, अशी मिश्किल टीपण्णी शरद पवार यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, “आपल्या राज्याचा क्रमांक आता सातवर गेलाय.राज्याची स्थिती काय आहे?, एककाळ असा होता राज्य पहिल्या दोन तीन क्रमांकावर असायचे, नियोजन आयोगाने यादी जाहीर केली. त्यात आपण 11 व्या नंबरवर आहोत, ही चिंतेची गोष्ट आहे.”

Post a Comment

0 Comments