काही दिवसांपासून नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्यात काहीतरी बिनसल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर देखील त्यांच्या वादाची चर्चा झाली होती. दरम्यान, नताशाने मागील काही महिन्यांपासून आपल्या इन्स्टाग्रामवर हार्दिक सोबतचा कोणताही फोटो शेअर केलेला नाही. आता तिने भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काहीही पोस्ट केलेलं नाही. शिवाय तिने टीमचं देखील अभिनंदन केलेलं नाही.
वर्ल्ड कपमध्ये इंडियन क्रिकेट टीमने दमदार परफॉर्मन्स केला. सोशल मीडियावर फॅन्स ते सेलेब्सपर्यंत, जवळपास प्रत्येक जण सोशल मीडियावर वर्ल्ड कपची चर्चा करत आहे. पण, भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेनकोविकने मौन धारण केले.
हार्दिक पांड्याच्या शानदार खेळीनंतर फॅन्स त्याचे कौतुक करताना थकत नाहीयेत. सोशल मीडियावर हार्दिकबद्दल अनेक पोस्ट पाहायला मिळत आहेत. परंतु, नताशा स्टेनकोविकने क्रिकेटर हार्दिकसाठी कोणतेही अभिनंदनाचे पोस्ट शेअर केले नाही.
0 Comments