Pankaja Munde | “विधानसभेपूर्वी पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करा,अन्यथा..”; बीडमधील बॅनरने राजकारण तापलं


 भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभेसाठी उभ्या राहिल्या होत्या. मात्र, शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी त्यांचा दारुण पराभव केला आहे. मात्र, मुंडे यांच्या समर्थकांनी हा पराभव अद्याप स्वीकारला नसल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पराभव झाल्यानंतर बीडमध्य कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे  यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावं, अशी मागणी केली होती. पंकजा मुंडेंचे समर्थक गणेश लांडे यांनी त्या संदर्भातले बॅनर लावले होते.

इतकंच काय तर, पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने दोन मुलांनी आत्महत्या केल्याचीही घटना घडली. अंबेजोगाई येथील तरूणाने 9 जून रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर अजून एका व्यक्तीने पराभव झाल्याने आपलं जीवन संपवलं. यामुळे बीडमध्ये तणाव निर्माण झाला होता.

आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचे बॅनर झळकले आहेत. अहमदनगरच्या पांगरमल येथील माजी सरपंच बाप्पुसाहेब आव्हाड यांनी पांढरीपूल फाटा येथे पंकजा मुंडे यांच्याबाबत लावलेल्या बॅनरच्या जोरदार चर्चा सध्या सुरू आहेत.

सरकारनं जर येत्या विधानसभा मतदानापूर्वी पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं नाही, तर सकल ओबीसी समाज भारतीय जनता पार्टीसह सत्तेत असणऱ्या कोणत्याही पक्षास मतदान करणार नाही, अशा आशयाचे बॅनर अहमदनगरच्या पांगरमल येथे लावण्यात आले आहेत.

सोबतच पक्षासाठी आणि समाजासाठी ज्यांचं योगदान नाही, त्यांना राज्यसभा देऊन मंत्रिपद दिलं जातं, मात्र पंकजा मुंडे यांना डावललं जातं, असं म्हणत कार्यकर्त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.यामुळे भाजपचं टेंशन वाढणार असल्याची आता चर्चा होऊ लागली आहे.

Post a Comment

0 Comments