कुणबी दाखले मिळण्याची प्रक्रिया गतिमान करा, जात पडताळणीला मुदतवाढ द्या - रश्मी बागल



करमाळा |

 कुणबी नोंदी व दाखले मिळण्याची प्रक्रिया गतिमान करून शैक्षणिक प्रवेशासाठीच्या जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची रश्मी बागल यांची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी  केली आहे.

 सध्या सर्वत्र विविध शैक्षणिक प्रवेशासाठी ची प्रक्रिया सुरू असून यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत कुणबी नोंदींची प्रक्रिया ही संथगतीने सुरु आहे दाखले मिळण्यास विलंब होत आहे ही संपूर्ण प्रक्रियाच  गतिमान करण्यात यावी. तसेच विविध शैक्षणिक  प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक असण्याचा नियम विद्यार्थ्यांना जाचक ठरत असून जुन्या नियमाप्रमाणे जातपडताळणी प्रस्तावाच्या पोहोच पावतीवर प्रवेश देत प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात यावी, अशी मागणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे राज्य साखर संघाच्या संचालिका भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल यांनी केली,यावर मंत्री महोदय यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.

 करमाळा तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात रश्मी बागल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात निवेदन देऊन ते सोडविण्यासाठी त्यांच्याशी सकारात्मक झाली. असून विविध प्रश्न सोडवण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले याची माहिती बागल यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments