मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बजरंग सोनावणेंनी आखला पुढील मास्टर प्लॅन


गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला सगेसोयऱ्यांचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंतरवली सराटीमध्ये मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज मनोज जरंगे पाटील यांच्या आंदालनाचा सहावा दिवस आहे. अशातच आता या आरक्षणाच्या मुद्द्याला वेगळाच वळण आलं आहे.

बजरंग सोनावणे आमदार, खासदारांची भेट घेणार :
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 8 जूनपासून मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक खासदार आमदार त्यांच्या भेटीसाठी जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी सगेसोयऱ्याचं आरक्षण मिळावे ही आहे. अशातच आता बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

यावेळी खासदार बजरंग सोनावणे म्हणाले की, राज्यातील सर्व खासदारांना एकत्र करून राज्यपालांची आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. तसेच यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली आहे. मनोज जरांगे यांच्या सगेसोयऱ्याचं आरक्षण मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना एकत्र करून आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याचं यावेळी नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितलं आहे.

खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्यपाल यांना यासंदर्भात पत्र लिहून मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेण्याची विनंती देखील केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात त्यांनी म्हटलेय की, 8 जून 2024 पासून मनोज जरांगे हे आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणास बसले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून त्यांनी अन्न, पाणी देखील घेतली नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती देखील खालावत चालली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याविषयी महाराष्ट्र राज्य शासनाची भूमिका उदासिनतेची दिसून येत असल्याचे त्यांनी पात्रात सांगितले आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने वेळीच दखल न घेतल्यास राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनोज जरंगे यांच्या भेटी आत्तापर्यंत जालना जिल्ह्याचे खासदार डॉ. कल्याणराव काळे, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे बंडू जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, अहमदपूर आमदार बाबासाहेब पाटील यांनी भेट घेतली आहे.

Post a Comment

0 Comments