बीडमधील वातावरण तापलं; पंकजा मुंडेंविषयीच्या ‘त्या’ पोस्टने खळबळ


बीड |

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी पाथर्डीतील एका युवकाने पंकजा मुंडे यांच्याविषयी अक्षेपार्ह स्टेटस ठेवला होता. यानंतर तणाव निर्माण झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान संबंधित तरूणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यापार्श्वभूमीवर आज सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीने पाथर्डी बंदची हाक देण्यात आली.

पंकजा मुंडे समर्थक आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेल्या मुलाच्या घरी जाब विचारायला गेले. तेव्हा पोलिसांनी मोठा फौजफाटा शिरापूर येथे तैनात केला होता. संबंधित घटना पाथर्डी पोलिसांनी अत्यंत गांभिर्याने घेत तरूणावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तरूणाने अचारसंहितेच्या काळात अशांतता निर्माण केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे  यांच्यावर एका युवकाने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. याचपार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची माहिती आता समोर आली आहे.

गणेशपार भागातील युवक गणेश हरिभाऊ सावंत या युवकाने फेसबुक या समाजमाध्यमावर पंकजा मुंडे यांच्याबाबत एक अक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे आता रान पेटलं आहे. त्यानंतर शहर पोलिसांनी या युवकाला त्वरीत ताब्यात घेतलं. मतदानापासून सोशल मीडियावर बारकाईने पोलीस लक्ष ठेऊन आहे. वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करताना दिसत आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे विजयी झाले. यावेळी पंकजा मुंडेंचा पराभव झाला. विजयाचं फॅक्टर हे मनोज जरांगे पाटील आहेत. बजरंग सोनवणे विजयी झाल्यानंतर एका युवकाने फेसबुकवर पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली असल्याची माहिती आता समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments